Udhyam Shiksha - Maharashtra

Executive - Field Operations (Shiksha Maharashtra)

Mumbai, Maharashtra
Work Type: Fixed Term Contract

टीप: मराठी आवृत्तीसाठी खाली स्क्रोल करा


Field Locations - Vacancies
(1) Satara - 1
(2) Amravati - 1

(3) Pune - 1 


About Udhyam:

Udhyam Learning Foundation (Udhyam) is on a mission towards Making Bharat Entrepreneurial. We believe that entrepreneurship is a powerful way to channelize an individual’s potential. Entrepreneurship enables agency and allows an individual to work on their strengths while creating value for the world.


Our programs:

  • Udhyam Shiksha works on developing entrepreneurial mindsets among the youth and enabling them to achieve their potential, having impacted ~24,00,000 learners across 12 Indian states.

  • Udhyam Vyapaar focuses on nano businesses in India, and solving large problems faced by them, at scale; having already enabled up to a 27% income uplift for 5000+ entrepreneurs.The goal for Udhyam is to build a thriving and supportive ecosystem, where every individual feels empowered to define their own path


About the Saksham Program:
In today's rapidly changing world, success requires not only knowledge—typically acquired through formal education—but also the right mindset and skills, which are often not formally taught. These skills include self-awareness, communication, critical thinking, persistence, and more. Individuals who cultivate these mindsets tend to perform better both personally and professionally. The Saksham Program helps students learn important life skills like solving problems, working with others, communicating well, and thinking clearly. These are skills needed in everyday life and work. Through this program, students will run a small project, where they can learn by doing and get ready for their future.


Who we’re looking for:

We are looking for a Field Coordinator for the Saksham Program in Maharashtra. The coordinator would work very closely with our stakeholders (Government official Seniors and Juniors, School Principals, Teachers and Udhyam team). The person would be responsible for good program implementation on ground for an assigned geographical area. The role involves a lot of field work (visiting schools and government offices) and focusing on reaching the goal. 


By working with students and teachers, you will directly help improve the way young people learn important skills. This means you are contributing to their future success and creating positive change in the education system.


Roles and Responsibilities:

Your main responsibilities include visiting schools, helping teachers and principals improve the program, and making sure the program is running well. You will also collect information about the schools you work with and meet with government officials regularly to keep them updated.


  1. This role requires traveling to different schools and government offices regularly. The work will involve visiting these places almost every day, observing classrooms, and speaking to teachers and school principals.

  2. Monitoring program implementation status through data, field visits, phone calls and active whatsapp communication (one must be curious and know what is happening in each assigned school)

  3. Sometimes, things may not go as planned. For example, schools might not have enough time to fully implement the program, or government offices may delay approvals. You should be comfortable with finding solutions in such situations.

  4. Ensuring regular data collection for schools in your geography for reporting and documentation purposes. Data collection means gathering information from schools, like filling out forms or reports about how the program is running, talking to teachers and principals on the phone, and staying updated through WhatsApp.

  5. Creating program reports to share internally and with government officials (writing official letters to share with senior government officials)

  6. You will also be meeting with government officers regularly. This means visiting their offices, discussing the program’s progress, and making sure they are happy with the work being done in schools.

  7. Assisting or conducting online and offline trainings when required along with Udhyam team

  8. Participating in online organizational meetings and events


Skills, Experience and Mindsets:

  1. A Bachelor’s degree in any field 

  2. Work experience in the social sector/ NGOs/ Government project is preferable

  3. Experience of working with schools and teachers in any capacity is an added benefit

  4. Working knowledge of Gmail, Excel, and Google Docs

  5. Multitasking skills

  6. Comfort and efficiency of communication for interacting with government teachers and principals 

  7. Spoken and read Marathi proficiency is a must. Working knowledge of English is good to have.

  8. Openness to uncertainties and challenges which may arise during the project implementation

  9. The role requires travel primarily across the assigned district, and elsewhere within Maharashtra (Bike is required for this role)



Commitment: Full time for a period of 6 months (contractual; to be continued if program is approved further by government department)


To apply, kindly click on the link or ‘Apply Now’ button. If you have any questions or want to know more about the job, feel free to call Mangesh Katekhaye on 9011393182.



फील्ड लोकेशन्स - रिक्त जागा
(1) सातारा - 1
(2) अमरावती - 1
(3) पुणे - 1 

उध्यम बद्दल:

उदयमा लर्निंग फाउंडेशन (उद्यमा) भारत उद्योजक बनवण्याच्या मिशनवर आहे. आमचा असा विश्वास आहे की उद्योजकता हा एखाद्या व्यक्तीच्या क्षमतेचे चॅनेलाइज करण्याचा एक शक्तिशाली मार्ग आहे. उद्योजकता एजन्सीला सक्षम करते आणि जगासाठी मूल्य निर्माण करताना एखाद्या व्यक्तीला त्यांच्या सामर्थ्यावर काम करण्यास अनुमती देते.

आमचे कार्यक्रम:

  • उद्यम शिक्षा तरुणांमध्ये उद्योजकीय मानसिकता विकसित करण्यावर आणि त्यांना त्यांची क्षमता साध्य करण्यासाठी सक्षम करण्यासाठी कार्य करते, ज्याने 12 भारतीय राज्यांमधील ~24,00,000 विद्यार्थ्यांना प्रभावित केले आहे.

  • उद्यम व्यापार भारतातील नॅनो व्यवसायांवर लक्ष केंद्रित करते आणि त्यांना भेडसावणाऱ्या मोठ्या समस्यांचे मोठ्या प्रमाणावर निराकरण करते; आधीच 5000+ उद्योजकांसाठी 27% पर्यंत उत्पन्न वाढीस सक्षम केले आहे. उदयमचे उद्दिष्ट एक भरभराट आणि सहाय्यक परिसंस्था तयार करणे आहे, जिथे प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा मार्ग परिभाषित करण्यास सक्षम वाटते.

सक्षम प्रोग्रॅमबद्दल:
आजच्या वेगाने बदलणाऱ्या जगात यशस्वी होण्यासाठी केवळ औपचारिक शिक्षण पुरेसे नाही. योग्य मानसिकता आणि जीवनकौशल्ये शिकणे आवश्यक आहे, ज्यामध्ये स्व-चेतना, संवाद, समस्या सोडवणे, चिकाटी ठेवणे इत्यादीचा समावेश होतो. सक्षम प्रोग्रॅम विद्यार्थ्यांना हे महत्त्वाचे जीवनकौशल्य शिकवतो, ज्यामुळे त्यांना समस्यांचे निराकरण कसे करावे, इतरांसोबत कसे काम करावे आणि स्पष्ट विचार कसा करावा, हे शिकता येईल. या प्रोग्रॅमद्वारे, विद्यार्थ्यांना स्वतःचा एक लहानसा प्रकल्प हाताळायला मिळेल, ज्यामुळे ते "करून शिकणे" या अनुभवातून भविष्याची तयारी करू शकतील.

आम्ही कोणाला शोधत आहोत:
आम्ही महाराष्ट्रात सक्षम प्रोग्रॅमसाठी फील्ड कोऑर्डिनेटर शोधत आहोत. हा कोऑर्डिनेटर शासकीय अधिकारी, शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि उद्यम टीमसह जवळून काम करेल. दिलेल्या क्षेत्रात प्रोग्रॅमची योग्य अंमलबजावणी करण्याची जबाबदारी तुमच्यावर असेल. या भूमिकेत खूप सारा फील्ड वर्क (शाळांना आणि शासकीय कार्यालयांना भेटी देणे) असेल, आणि ठरवलेल्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्यासाठी लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

विद्यार्थ्यांसोबत आणि शिक्षकांसोबत काम करून तुम्ही त्यांना जीवनकौशल्य शिकवण्यात मदत कराल, ज्यामुळे तुम्ही त्यांच्या भविष्यातील यशात आणि शिक्षण व्यवस्थेत सकारात्मक बदल घडवून आणू शकाल.

भूमिका आणि जबाबदाऱ्या:

  • तुमच्या मुख्य जबाबदाऱ्या म्हणजे शाळांना भेट देणे, शिक्षक आणि मुख्याध्यापकांना प्रोग्रॅम सुधारण्यासाठी मदत करणे, आणि प्रोग्रॅम व्यवस्थित चालत आहे याची खात्री करणे.

  • तुम्ही ज्या शाळांसोबत काम करत आहात, त्यांच्याबद्दल माहिती गोळा करणे आणि शासकीय अधिकाऱ्यांना प्रोग्रॅमची प्रगती सांगण्यासाठी त्यांना नियमितपणे भेटणे.

  • तुमच्या जिल्ह्यातील शाळांना नियमितपणे भेट देणे, वर्ग निरीक्षण करणे आणि शिक्षक व मुख्याध्यापकांशी संवाद साधणे.

  • तुम्हाला डेटा, फील्ड भेटी, फोन कॉल आणि व्हॉट्सअ‍ॅपद्वारे प्रोग्रॅमची अंमलबजावणी कशी चालू आहे यावर लक्ष ठेवावे लागेल.

  • कधी कधी गोष्टी नियोजनाप्रमाणे होत नाहीत. उदाहरणार्थ, काही शाळांमध्ये वेळ कमी असतो, किंवा शासकीय कार्यालयांतून मान्यता मिळण्यात उशीर होतो. अशा वेळी तुम्हाला समस्यांचे निराकरण करण्यासाठी तयारीने पुढे येणे आवश्यक आहे.

  • तुमच्या क्षेत्रातील शाळांसाठी नियमित डेटा संकलन करणे, म्हणजे प्रोग्रॅम कसा चालू आहे याची माहिती गोळा करणे, फॉर्म्स भरणे, फोनवर शिक्षक आणि मुख्याध्यापकांशी बोलणे, आणि व्हॉट्सअ‍ॅपद्वारे सतत अपडेट राहणे.

  • शासकीय अधिकाऱ्यांसोबत नियमितपणे भेटणे, त्यांच्या कार्यालयांना भेट देणे, प्रोग्रॅमची प्रगती सांगणे आणि शाळांमधील कामाबद्दल त्यांना समाधानी ठेवणे.

  • गरजेनुसार ऑनलाइन आणि ऑफलाइन प्रशिक्षण आयोजित करणे किंवा त्यात सहभागी होणे.

  • संघटनात्मक बैठकींमध्ये आणि इव्हेंट्समध्ये सहभाग घेणे.

कौशल्ये, अनुभव आणि मानसिकता:

  • कोणत्याही शाखेतील पदवी

  • सामाजिक क्षेत्र/ NGO/ शासकीय प्रकल्पात कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य

  • शाळा आणि शिक्षकांसोबत काम करण्याचा अनुभव असल्यास अधिक फायदा

  • जीमेल, एक्सेल आणि गूगल डॉक्सचे कामकाजाचे ज्ञान

  • एकाचवेळी अनेक कामे करण्याची क्षमता

  • शासकीय शिक्षक आणि मुख्याध्यापकांशी संवाद साधण्यात सहजता आणि प्रभावीपणा

  • मराठी बोलणे आणि वाचणे आवश्यक आहे; इंग्रजीचे कामचलाऊ ज्ञान असावे

  • प्रोजेक्टच्या अंमलबजावणी दरम्यान येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी

  • या भूमिकेसाठी प्रवास मुख्यतः दिलेल्या जिल्ह्यात, तसेच महाराष्ट्रातील इतर भागांत असू शकतो. (या भूमिकेसाठी बाईक आवश्यक आहे.) 


प्रतिबद्धता:
पूर्ण वेळ, 6 महिन्यांचा कालावधी (करारावर आधारित; शासकीय विभागाकडून प्रोग्रॅमला पुढील मान्यता मिळाल्यास कालावधी वाढवला जाऊ शकतो)

अर्ज करण्यासाठी, कृपया लिंकवर क्लिक करा किंवा ‘Apply Now' बटणावर क्लिक करा. तुम्हाला काही प्रश्न असल्यास किंवा नोकरीबद्दल अधिक जाणून घ्यायचे असल्यास, मंगेश काटेखाये यांना 9011393182 या क्रमांकावर कॉल करा.




Submit Your Application

You have successfully applied
  • You have errors in applying